Help:पान/लेख संपादन
![]() |
Note: When you edit this page, you agree to release your contribution under the CC0. See Public Domain Help Pages for more info.
|
![]() |
विकिवरील मजकूराचे संपादन करणे फार सोपे आहे:
वडार समाज अधिक माहिती संपादन# "संपादन" पानाचे वर असलेली 'संपादन' कळ टिचका.
- मजकूरात बदल करा.
- "हा लेख साठवा"'कळ टिचका.
इतके सोपे!
Contents
संपादनाचे नियम,संपादनांच्या चालीरिती व प्रारुपण (फॉरमॅटींग)
विकिमजकूराच्या संपादनाविषयी सर्वात पहिला नियम असा कि,"धाडसी रहा". पुढे चला- बदल करा.इतर लोकं आपण केलेल्या चुका सुधरवु शकतात, म्हणून धाडस ठेउन प्रयत्न करा!विकिपानांचे संपादन करण्यास पुष्कळ प्रकारच्या चालीरिती,नियम व तत्वज्ञान आहेत,या पैकी 'धाडसी रहा' हा नियम सर्वात महत्वाचा आहे.
आपल्या संपादनाने संपूर्ण नविन परिच्छेदाचे किंवा पानावरील माहितीचे योगदान होऊ शकते.ते, पानावरील टकनचुका किंवा स्पेलिंग दुरुस्त करण्याइतके ते सोपे आहे. सामान्यरित्या,स्वच्छ दिसणारा त्रोटक असा मजकूर जोडा किंवा संपादन करा.सर्वात महत्वाचे,ही खात्री करा कि,आपला उद्देश असा आहे ज्याने विकिचा आशय वर्धित होईल.
आपणास कोणत्याही प्रकारचे प्रारुपण(फॉरमॅटींग) करावयाचे असल्यास,जसे नविन शीर्षकास किंवा त्याचे ठळक करण्यास,आपण ते विकि वाक्यविन्यास वापरून किंवा संपादनाच्या प्रभागावरील संपादन साधनपट्टी ही वापरून करू शकता. साहाय्य:प्रारुपण हे काही सामान्य प्रारुपण वापरण्यास बघा.
संपादन सारांश
आपण आपले बदल जतन(सेव्ह) करण्यापूर्वी,आपल्या संपादनांची एक त्रोटक नोंद बदलांचा आढावा : येथे टाका.या बद्दल जास्त काळजी करू नका किंवा यात जास्त वेळ घालवू नका:फक्त आपण केलेल्या बदलाचे थोडक्यात वर्णन द्या.उदाहरणार्थ, आपण असे म्हणु शकता जसे, ""टंकनचुका दुरुस्त केल्या "" किंवा ""सूर्यफुलाबाबत अधिक माहिती टाकली""
हा सारांश आपल्या संपादनाच्या ओळीतच जतन होतो व या विकिवर इतर लोकांना परिणामकारकरित्या बदलांचा मागोवा घेण्यास मदत करतो.
झलक
जतन करण्यापूर्वी, आपण केलेले संपादन कसे दिसेल त्यासाठी, "झलक दाखवा" ही कळ वापरण्याची कल्पना चांगली आहे.याचा संबंध बदलांचा मागोवा घेण्यास आहे, कारण प्रत्येक वेळेस आपण जतन केल्यावर,ते इतरांस 'वेगळा बदल' म्हणून दिसते.याबद्दल जास्त चिंता करावयाची गरज नाही,परंतु, आपल्या कामात झालेल्या चुका सुधरवण्याची ती एक चांगली सवय आहे.जतन करण्यापूर्वी,'झलक पहा' वापरण्याने, थेट जतन करणे व त्यापोटी झालेल्या एक किंवा अनेक छोट्या चुका सुधरविण्यास दुसरे संपादन सुरू करणे, हे टाळता येते.
बदल दाखवा
दूसरा विकल्प "बदल दाखवा" ही कळ आहे, जी सध्याची आवृत्ती व आपण संपादन केलेली आवृत्ती यामधील फरक दाखविण्यास मदत करते.
इतर प्रकारची संपादने
विकिसंपादनाने, आपण नविन पान सुरू करु शकता,त्याचे स्थानांतरण (किंवा त्याचा नामबदल) करु शकता, हेच काय, आपण ते पान वगळुही शकता:
लक्षात ठेवा,'विकिवरील एकुण आशय वर्धन करावयाचा' हे आपल्या संपादनांचे ध्येय असावयास हवे.
चर्चा
प्रत्येक लेखास त्याचे स्वतःचे असे “चर्चा पान” असते जेथे,आपण (त्या लेखाबद्दल) प्रश्न विचारू शकता, सुचवण्या करू शकता, किंवा, त्यातील चुकांची चर्चा करू शकता. साहाय्य:चर्चा पाने बघा.