|
|
साम्राज्यवाद हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश किंवा राष्ट्र दुसर्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे.
रोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच वसाहती साम्राज्य, जपानी साम्राज्य, जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य इत्यादी साम्राज्य ही जगातील एकेकाळची आघाडीची साम्राज्ये होती. युरोपीय राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत, चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर विविध प्रकारे आपला साम्राज्यावाद लादला होता. त्यातून आशिया खंडात साम्राज्यवादास सुरूवात झाली. इ.स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनार्यावरील कालिकत बंदरावर पोहचला. तेथील झामोरिन राजाकडून त्याने व्यापारी सवलती मिळवल्या. प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगीजांना विशेष महत्त्व होते. पण एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ताविस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा पोर्तुगीजांनी प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना भारतात प्रबळ साम्राज्य निर्माण करता आले नाही. त्यांना केवळ गोवा, दमण आणि दीव या प्रदेशावरच समाधान मानावे लागले. पोर्तुगीजांच्या नंतर डच भारतात व्यापार करण्याकरिता इ.स. १५९५ मध्ये आले. डचांनीसुद्धा भारतात येवून व्यापाराला सुरूवात केली. पण व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी आपले लक्ष आग्नेय आशियातील बेटांवरच केंद्रित केले. इ.स. १६२५ पासून फ्रेंचांनी भारतात व्यापार सुरू केला. पण फ्रेंचांना केवळ चंद्रनगर, पॉन्डिचेरी, कराईकल, यानम व माहे हे प्रदेशच हस्तगत करण्यात यश मिळाले. इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मोगलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मोगल बादशहा जहांगीरकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल सरदारांच्या आपापसातील मतभेदांमुळे मोगल सत्ता कमकुवत झाली. या काळात भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने इंग्रजांनी भारताच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली.
पुढे वाचा... 
मागील अंक - जुलै २०१५ - मे २०१५ - एप्रिल २०१५ - मार्च २०१५ - ऑक्टोबर २०१४ - ऑगस्ट २०१३ - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक
पुढील अंक - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत येथे द्या.
|
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग
|
|
|
|
|
|
|
अलिकडील मृत्यू: रवींद्र जैन, रामकृष्ण सूर्यभान गवई, ए.पी.जे. अब्दुल कलाम, वसुंधरा कोमकली, लक्ष्मण लोंढे भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर |
|
|
सारडे हे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे आगरी समाजाची वस्ती आहे. येथून जवळच असलेले भंगारपाडा हा याच ग्रामपंचायतीचा एक भाग आहे. गावच्या एकूण लोकसंख्येपैकी २.३% लोक कातकरी आहेत.
गाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासून जवळ घरे बांधली आहेत. वरती राधाकृष्णाचे मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदू धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखील मृर्ती आहे. श्रीराधाकृष्णमंदिरात श्री राजारामबुवा सारडेकर यांचे कृष्णजन्माष्टमीच्या आधीच्या आठवड्यामध्ये होणारे भजन हे गावचे विशेष आकर्षण असते. भंगारपाड्यात कराडी समाजाची वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस श्री बहिरी देवाचे मंदिर आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात. तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन पातळगंगा नदीच्या खाडीस जाऊन मिळते. गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला कडापे ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे तांदळांची शेती मोठ्या प्रमाणात करतात. येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला घोल म्हणतात. जेथे पावसाळ्यात पंचक्रोशीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा देवकन्या वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक बाया म्हणतात .
गोपाळकाला हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात.
त्यांचे गावाशी असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. गावाबाहेर राहणार्या व्यक्ति गोपाळकालासाठी आणि गणपतीसाठी दरवर्षी गावाला भेट देतात. (पुढे वाचा...)
|
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
|
- ...की, सिंहाची डरकाळी आठ ते दहा मैलां पर्यंत ऐकू येते?
- ...की, फ्रांस या देशात एकही डास नाही?
- ...की, तुर्कीमधील इस्तंबूल जगातील एकमेव असे शहर आहे जे आशिया व युरोप या दोन खंडांत विसावले आहे?
- ...की, जिराफाच्या पाठीत जेवढे मणके असतात (सहा) तेवढेच मणके उंदराच्या पाठीत असतात?
- ...की, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी ज्वालामुखी मंगळावर आहे. या ज्वालामुखीची उंची २६.४ कि.मी. आहे?
- ...की, जगातील सर्वात खोल जागा प्रशांत महासागरातील मरियाना ही आहे. हिची खोली ११ कि.मी. एवढी आहे?
- ...की, आपल्या चाव्यांनी माणसाला हैराण करणाऱ्या डासांना दात नसतात?
- ...की, ताजमहालाचा रंग सकाळी गुलाबी, दुपारी पांढरा तर रात्री सोनेरी दिसतो?
- ...की, सहारा वाळवंटातील तापमान सकाळी ४५ अंश सेल्सियस असते तर रात्री ते ५ अंश सेल्सियस पर्यंत उतरते?
- ...की, शुक्र हा ग्रह हा पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे तेथे सूर्य हा पश्चिमेकडे उगवतो व पूर्वेकडे मावळतो?
- ...की, पी.टी. उषा हीचे पूर्ण नाव पीलुवालकंडी टेकापरवील उषा असे आहे?
- ...की, बिल गेट्स प्रत्यक सेकंदाला १२००० रूपये व एका दिवसात १०३ कोटी रूपये कमावितो?
- ...की, ज्या हाताने तुम्ही लिहीता त्या हाताच्या बोटाची नखे सगळ्यात जास्त वेगाने वाढतात?
- ...की, फक्त मनुष्य हा प्राणीच पाठीवर झोपू शकतो?
वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.
|
|